पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर काही दिवसांनी चेन्नईमध्ये शस्त्रक्रिया बंद कराव्या लागतील

प्रातिनिधिक छायाचित्र

देशाच्या काही भागात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी अद्याप तामिळनाडूमध्ये अनेक भागांत तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. राज्याची राजधानी चेन्नईमध्ये पाणी टंचाईची स्थिती इतकी तीव्र आहे की अजून काही दिवस हिच स्थिती राहिल्यास येथील रुग्णांवर कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया बंद कराव्या लागतील. 

चेन्नईमधील सुदर रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. टी. एन रविशंकर म्हणाले, जर चेन्नईमधील पाणी पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही, तर रुग्णालयातील उपचार देवाच्या भरवशावर सोडावे लागतील. चेन्नईमध्ये बंद पाईपद्वारे होणारा पाणी पुरवठा आधीच बंद झाला आहे. आता टॅंकरद्वारे होणारा पाणी पुरवठाही बंद होण्याची वेळ आली आहे. जर हिच स्थिती आणखी महिनाभर कायम राहिल्यास आम्हाला रुग्णालय बंद ठेवण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

आमदारासमोर कार्यकर्त्यांची दादागिरी; आगार व्यवस्थापकाला मारहाण

पाण्याच्या टंचाईमुळे चेन्नईतील उपचारही आणखी महागले आहेत. पाणी टंचाईमुळे रुग्णालयांवर येणारा आर्थिक भार साहजिकच रुग्णांवर ढकलला जातो आहे, याकडे रविशंकर यांनी लक्ष वेधले. 

तामिळनाडूमध्ये गेल्यावर्षी पुरेसा पाऊस पडला नव्हता. यंदाही देशात पावसाचे आगमन झाले असले, तरी काही भाग वगळता इतरत्र मुसळधार पावसाची अद्याप प्रतिक्षाच आहे. त्यातही तामिळनाडूतील स्थिती अजून वाईट आहे. तिथे तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे तेथील रुग्णसेवेवरही दुष्काळाचा परिणाम झाला आहे.