पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोळ्यावर पट्टी बांधून २ मिनिटांत पझल सोडवत तिची गिनीस रेकॉर्डवर मजल!

पझल सोडविणारी सराह (फोटो - एएनआय)

चेन्नईमध्ये सहा वर्षांच्या एका मुलीने डोळ्यावर पट्टी बांधून रुबिक क्यूब पझल अवघ्या दोन मिनिटांत सोडवून विक्रम प्रस्थापित केला. सराह असे या मुलीचे नाव असून, तिच्या या भन्नाट कामगिरीची गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.

टू बाय टू क्यूब पझल हातात घेऊन सराहने ते दोन मिनिटे ७ सेकंदात सोडवून दाखवले. तिच्या डोळ्यावर यावेळी पट्टी बांधण्यात आली होती. त्यामुळे तिला काहीच दिसत नव्हते. तमिळ कवी वैरामुथू यांच्या कवितेच्या ओळी गुणगुणत तिने ही कामगिरी केली. 

...मग भाजपला भीती कशाची, पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

सराहचे वडील चार्ल्स यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, लहानपणापासूनच तिला वेगवेगळी कोडी सोडविण्याची आवड निर्माण झाली होती. आमच्या हे लक्षात आल्यावर आम्ही तिला आवश्यक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सराहने जागतिक विक्रम आधीच केला होता. आता तिने गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. बौद्धिक प्रश्न सोडविण्यात ती कायमच अग्रेसर असते. 

INDvs BAN : ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियाचा 'विराट' विजय

आपल्याला अशा स्वरुपाच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला खूप आवडते, अशी प्रतिक्रिया सराहने व्यक्त केली.