पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुसऱ्या महायुद्धातील २५० किलोचे जिवंत बॉम्ब सापडले

जीवंत बॉम्ब सापडले

दुसऱ्या महायुध्दात वापरण्यात आलेले जीवंत बॉम्ब जर्मनीमध्ये सापडले आहे. जर्मनीतील डॉर्टमुंड शहरामध्ये जमिनीखाली चार जीवंत बॉम्ब सापडले. यामधील दोन बॉम्ब निकामी करण्यात आले आहेत. यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.

सुशिक्षितांनाही शिकवावे लागते याचे हे योग्य उदाहरण, लेखींचे उत्तर

डॉर्टमुंड शहरामध्ये सापडलेल्या एका बॉम्बचे वजन ३३० पाउंड (२५० किलो) ऐवढे आहे. प्रशासनानाला सुरुवातीला वाटले की त्यांनी ४ बॉम्ब निकामी केले. मात्र त्यानंतर त्यांनी स्पष्टिकरण देत फक्त दोन बॉम्ब निकामी केले असल्याचे सांगितले.  

JNU हिंसाचाराशी संबंधित सदस्यांचे मोबाईल जप्त करा: दिल्ली हायकोर्ट

बॉम्बला निकामी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी दोन रुग्णालय रिकामी केली होती. ज्याठिकाणी बॉम्ब सापडला होता. त्या परिसराच्या आसपास राहणारे जवळपास १४ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. तसंच शहरातील रेल्वे स्टेशन देखील बंद करण्यात आले होते.

बजाजची इलेक्ट्रिक चेतक : रिव्हर्स गिअर, घरातच चार्ज करता येणार

बॉम्ब निकामी करण्यात आल्यानंतर रेल्वे स्टेशन पुन्हा सुरु करण्यात आले. बॉम्बला निकामी करण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून संपूर्ण परिसराची पाहणी करत कोणी व्यक्ती त्या परिसरात नाही ना हे पाहिले. दरम्यान, दुसरे महायुध्द संपून तब्बल ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

धक्कादायक: धावत्या एक्स्प्रेसमधून महिलेची बॅग हिसकावली