पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जगातल्या सर्वाधिक कमी उंचीच्या व्यक्तीचं २७ व्या वर्षी निधन

(छाया सौजन्य : ANI)

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डधारक जगातील सर्वात कमी उंचीच्या व्यक्तीचं  शुक्रवारी  नेपाळमधील रुग्णालयात निधन झालं.  खगेंद्र थापा असं या व्यक्तीचं नाव असून त्याची उंची २ फूट २ इंच होती. न्यूमोनियामुळे त्याचं निधन झालं.

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद;शिर्डीकरांच्या बंदला २५ गावांचा पाठिंबा

खगेंद्रच्या नावाची २०१० साली गिनिझ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. त्यावेळी तो १८ वर्षांचा होता. मात्र  काही वेळातच त्यानं हा विक्रम गमावला होता. हा विक्रम नंतर नेपाळच्या चंद्रा डांगीच्या नावे झाला. त्याची उंची केवळ ५४.६ सेंटीमीटर होती. मात्र २०१५ मध्ये चंद्रा यांच्या मृत्यूनंतर हा रेकॉर्ड पुन्हा खगेंद्रच्या नावे जमा झाला. 

मुनगंटीवार, क्षीरसागरांचं वास्तव्य अजूनही सरकारी बंगल्यात, PWDची नोटीस

खगेंद्र हा जगभरातील अनेक देशांत फिरला आहे.  तो नेपाळच्या पर्यटन जाहिरातीचा चर्चेतील चेहराही होता.  अनेक देशांमधील कार्यक्रमात खगेंद्र याची पाहुणा म्हणून उपस्थिती असायची.