पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्मला सीतारामन यांच्या टीकेला रघुराम राजन यांचे खणखणीत उत्तर

रघुराम राजन

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाच्या कार्यकाळात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाच भारतातील बँकिंग व्यवस्था वाईट स्थितीत गेल्याची टीका निर्मला सीतारामन यांनी केली. त्याला उत्तर देताना रघुराम राजन यांनी आपल्या गव्हर्नरपदाच्या कार्यकाळात सर्वाधिक काळ केंद्रात भाजपचेच सरकार सत्तेवर होते, याकडे लक्ष वेधले.

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चा फिस्कटली : उद्धव ठाकरे

रघुराम राजन यांनी ५ सप्टेंबर २०१३ रोजी भारतातील या केंद्रीय बँकेचे गव्हर्नरपद स्वीकारले. त्यानंतर सप्टेंबर २०१६ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे सरकार मे २०१४ मध्ये सत्तेत आले होते. बुडीत कर्जांच्या फेऱ्यात अडकलेल्या बँकिंग व्यवस्थेला त्यातून बाहेर काढण्याचे काम आपल्याच कार्यकाळात सुरू झाले आणि ते कार्यकाळ संपेपर्यंत संपुष्टात आले नव्हते, असे रघुराम राजन यांनी स्पष्ट केले. 

आर्थिक विकास साधण्यासाठी आणि विकासदर वाढविण्यासाठी भारताने नव्या स्वरुपाच्या आर्थिक सुधारणा तातडीने केल्या पाहिजेत. विकासदर ५ टक्क्यांपर्यंत राहिल्याने एक प्रकारे भारतात आर्थिक मंदीसारखीच अवस्था असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉग्निझंटमधून लवकरच १३००० कर्मचाऱ्यांची कपात

सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन यांनी म्हटले आहे की, आधीच्या काँग्रेस सरकारच्या काळात मी केवळ आठ महिनेच गव्हर्नरपदावर कार्यरत होतो. त्यानंतर पुढील २६ महिने केंद्रामध्ये भाजपचेच सरकार होते. माझ्या कार्यकाळातील सर्वाधिक कालावधीत केंद्रात भाजपचेच सरकार होते.

दरम्यान, भारतातील बँकिंग व्यवस्थेचा वाईट काळ या स्वरुपाच्या प्रतिक्रियेवर उत्तर देऊन आपल्याला कोणत्याही राजकीय वादात पडायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.