पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

RSS प्रमुख भागवत म्हणाले, राम का काम करना है !

मोहन भागवत

लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमताने विजय मिळल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. 'रामाचे काम करायचे आहे, आणि रामाचे काम होणारच', असे मोहन भागवत यांनी संघाच्या एका कार्यक्रमात म्हटले आहे. भागवत यांनी अयोध्येतील राम मंदिराबाबत स्पष्ट सांगितले नसले तरी त्यांचे हे सूचक वक्तव्य असल्याचे बोलले जात आहे. 

राम जन्मभूमीप्रकरणी मध्यस्थी समितीला सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ

उदयपूर येथे संघाच्या दि्वितीय वर्षाचे प्रशिक्षण सुरु आहे. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, 'रामाचे काम करायचे आहे, आणि रामाचे काम होणारच. रामाचे काम करणे म्हणजे आपले काम करणे आहे. आपले काम आपण स्वतः केले तर ते चांगले असते. दुसऱ्याकडे दिले तर कोणाची तरी निगराणी करण्यासारखे असते.' तत्पूर्वी, मुरारी बापू यांनी रामाचे काम सगळ्यांना करायचे आहे, असे म्हटले होते. तो धागा पकडूनच भागवत यांनी रामाचे काम होईलच असे वक्तव्य केले. 

नुसतेच जय श्रीराम म्हणता, एकतरी राम मंदिर बांधले का?, ममतांचा मोदींना सवाल

उदयपूर येथे सुरु असलेल्या या कार्यक्रमात भागवत हे चार दिवस सहभागी होणार आहेत. या शिबिरात सुमारे ३०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. आरएसएसने लोकसभा निवडणुकीच्या आधीही भाजप सरकारवर राम मंदिरावरुन आपली नाराजी व्यक्त केली होती. संघाच्या एका नेत्याने भागवत यांचा हवाला देत. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात कोणाचेही सरकार येऊ दे राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे म्हटले होते.