देशात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम' करण्याची मुभा दिली आहे. परंतु, आता यामुळे नवीन धोका समोर येत आहे. घरुन काम करताना कार्यालयाचा डेटा लीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्णालयांपासून ते कंपनींचा डेटा लीक होण्याची प्रकरणे समोर येत आहेत. भारतात मागील तीन महिन्यात १०००० हून अधिक सायबर हल्ल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
भारताची लोकसंख्या १३५ कोटी, व्हेंटिलेटर केवळ ४० हजार
सायबर आणि कायदे तज्ज्ञांच्या मते, भारतातही घरातील इंटरनेट कनेक्शनवर कार्यालयाचे काम करताना अशा घटना समोर येण्याची शक्यता आहे. भविष्यात ही प्रकरणे न्यायालयात गेल्यामुळे कंपन्यांचाही वेळ वाया जाऊ शकतो. लॉकडाऊनसारख्या परिस्थितीमुळे देशातील अनेक कर्मचारी घरातूनच कार्यालयीन काम करत आहेत. अनेक लोकांना कार्यालयातून आवश्यक त्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तर अनेक ठिकाणी अनेकजण यासाठी स्वतःचे इंटरनेट आणि लॅपटॉप वापरत आहेत.
आतापर्यंत पाहण्यात आलेल्या ट्रेंडमध्ये फिशिंग ई-मेलच्या माध्यमातून लोकांना बळी पाडले जात आहे. हे ई-मेल नोकरी किंवा लॉटरीसारख्या प्रकरणांशी निगडीत असतात. ई-मेल उघडताच व्यक्तीचा कॉम्प्युटर जर सुरक्षित नसेल तर तो हॅक केला जातो. त्यानंतर सर्व स्क्रीन शॉट, डाऊनलोड करण्यात आलेल्या फायली आणि सर्व माहिती हॅकरकडे जाते. त्याचा चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता असते.
त्या १४ दिवसांत काय केले, कोरोनाबाधित दाम्पत्यानं सांगितला अनुभव
आशिया पॅसिफिक क्षेत्रात एक तृतीयांश हल्ले पाहायला मिळाले आहेत. देशात मागील तीन महिन्यांत १०००० स्पॅम अॅटक झाले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये ६०००, इंडोनेशियामध्ये ५००० सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत. इतकेच नव्हे तर झेक रिपब्लिकमध्ये कोरोना टेस्टिंगच्या सर्वांत मोठ्या प्रयोगशाळेवर सायबर हल्ला करण्यात आला होता.