पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NRC संदर्भात गृह मंत्रालयाची महत्त्वाची माहिती, ही कागदपत्रे मागणार नाही

केंद्रीय गृह मंत्रालयाचे कार्यालय (संग्रहित)

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या वरून देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी मोर्चे निघत असून, निदर्शने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. एनआरसीसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची अट तितकी कडक नसेल, जितकी आसाममध्ये होती. आसाममध्ये एनआरसीनंतर १९ लाख लोकांना बेकायदा ठरविण्यात आले. पण देशाच्या इतर भागात एनआरसीसाठी इतक्या कठोर पद्धतीने कागदपत्रांची शहानिशा केली जाणार नसल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

Jharkhand Exit Poll: भाजपला धक्का बसणार, JMM-काँग्रेसकडे सत्ता ?

देशाच्या इतर भागातील नागरिकांना केवळ त्यांच्या जन्माबद्दलची माहिती द्यायची आहे. जन्मतारीख, महिना, वर्ष इतके सांगायचे असेल. पण आपल्या आई-वडिलांसंदर्भातील कोणतीही कागदपत्रे सरकारकडे सादर करण्याची अट नसेल. नागरिक केवळ त्यांच्या जन्माबद्दलची कागदपत्रे सादर करू शकतात, असे गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील अद्ययावत FAQ मध्ये म्हटले आहे.

एनआरसीवरून सध्या अनेक नागरिक प्रश्न विचारत आहेत. लवकरच एनआरसी देशाच्या सर्व राज्यांमध्ये केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये शंका आहेत. त्याला ट्विटरच्या माध्यमातून उत्तर देताना गृह मंत्रालयाने ही माहिती दिली. या संदर्भातील माहिती अद्याप पत्र-सूचना कार्यालयाच्या वेबसाईटवर देण्यात आलेली नाही.

CAA: आंदोलकांना शांतता राखण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, वाहतूक परवाना, विम्याची कागदपत्रे, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जमिनीची कागदपत्रे ही कागदपत्रे पुरावा म्हणून जोडली जाऊ शकतात, असे FAQ मध्ये लवकरच दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.