पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: व्यासपीठावरच महिलेने धरले स्मृती इराणींचे पाय

स्मृती इराणी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या उत्तर प्रदेशमधील आपल्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत त्या विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शनिवारी त्या अमेठीतील तिलोई विधानसभा मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी व्यासपीठावरच एका महिलने त्यांचे पाय धरले. आपली जमीन आपले कुटुंबीय हडप करत असल्याची तक्रार त्यांनी केली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये व्यासपीठावर स्मृती इराणी यांना एक महिला तक्रारीचे पत्र देऊन त्यांचे पाय पकडताना दिसते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्मृती इराणी याही भांबावल्या. त्या महिलेला उभा करण्याचा प्रयत्न करत न्याय देण्याचे आश्वासन देत होत्या. महिलेला उभे करुन तिला दिलासा देत होत्या. 

याचदरम्यान व्यासपीठावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि मंत्री मोहसिन रजा समवेत इतर भाजप नेतेही उपस्थितीत होते. स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता. सध्या त्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत.