पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

ओवेसींच्या सभेत तरुणीची घोषणाबाजी

बंगळुरूमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमूल्या असे या तरुणीचे नाव असून तिला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी तिला जामीन देण्यास नकार दिला आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Video: ओवेसींच्या सभेत तरुणीकडून 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी

बंगळुरुमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी सहभागी झाले होते. रॅलीनंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेला सुध्दा असदुद्दीन ओवेसी यांनी हजेरी लावली. ओवेसी मंचावर उपस्थित असताना त्यांच्यासमोरच अमूल्याने माईक हातात घेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.  त्यामुळे सभेमध्ये एकच गोंधळ उडाला 

दादरमध्ये कापडाच्या दुकानाला भीषण आग
 
या घटनेवर बोलताना ओवेसींनी सांगितले की, 'मी या घटनेचा मी निषेध करतो. संबंधित तरुणीचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही. आमच्यासाठी भारत जिंदाबाद आहे आणि राहिल. आयोजकांनी कार्यक्रमासाठी या तरुणीला बोलवायला नको होते. आमची मोहिम ही भारताच्या संरक्षणाची आहे. आम्ही शत्रू राष्ट्राचे समर्थन कधीच करणार नाही. या तरुणीला विरोधकांनी पाठवले असेल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. 

...तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल; मनसेचा वारिस पठाणांना इशारा