पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तरुणीला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना आली जागा

तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा परिसरात आपला पगार मागायला गेलेल्या मेकअप आर्टिस्ट तरुणीला सलून मालकाने बेदम मारहाण केल्याचा धक्कायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास २५ वर्षीय महिला आपण केलेल्या कामाचा मोबदला मागण्यासाठी युनिसेक्स या सलूनमध्ये आली होती. यावेळी सलून मालकाने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने तरुणीला बेदम मारहाण केली. यात ती जखमी झाली आहे. 

संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे तरुणीला मारहाण होत असताना लोकांनी गर्दी केली. या गर्दीतील काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ काढला मात्र कोणीही तिला वाचवण्यासाठी पुढे आले नाही.  

ममता बॅनर्जींचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर करणाऱ्या भाजप कार्यकर्तीला जामीन

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. युनिसेक्स सलूनच्या मालकासह त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मालकाला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी नोएडा परिसरात असलेल्या युनिसेक्स सलूनमध्ये मेकअप अर्टिस्टच्या कामाला होती. आपले एक महिन्याचे वेतन मागण्यासाठी आल्यानंतर सलून मालक वासीम ने तिला केबिनमध्ये नेले. त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेन नकार दिल्यानंतर वासीम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तिला फरफटत दुकानाबाहेर आणले. त्यानंतर तिला बेदम मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.