पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या गोळीबारात महिलेचा मृत्यू, एक जखमी

काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये अज्ञात दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाला आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. यामागे दहशतवादीच आहेत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

निगीना बानो असे या घटनेत मृत पावलेल्या महिलेचे नाव असून, मोहम्मद सुल्तान असे जखमी झालेल्या नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. स्थानिक पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दहशतवाद्यांनीच हा गोळीबार केलेला आहे. दरम्यान, मृत पावलेल्या महिलेचा पतीही २०१७ मध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला होता. 

चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत सुरक्षादलांनी काश्मीर खोऱ्यात केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत १०१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक खबरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पुलवामा, शोपियाँ, कुलगाम आणि अनंतनाग या चार जिल्ह्यांत सर्वाधिक दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली.