पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Viral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड

गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड

हिवाळा जवळ येत आहे. हिवाळ्याची तयारी म्हणून  एका खारूताईनं गाडीच्या हूडमध्ये एक दोन नाही तर तब्बल २०० अक्रोड जमा करून ठेवले होते. हिवाळ्यात खारूताई झाडाच्या ढोलीत किंवा घरट्याच्या कोपऱ्यात खाद्याचा साठा जमवून ठेवते. 

अमेरिकेतील एका जोडप्याला त्यांच्या गाडीच्या हूडमध्ये खारीनं हिवाळ्यासाठी साठवून ठेवलेली  शिदोरी आढळली. होली परसिक नावाची महिला गाडी चालवत होती तेव्हा गाडीतून करपल्याचा वास आणि विचित्र आवाज येत होता.

सीवूडमध्ये किड्यांचा उच्छाद; नागरिक हैराण

जेव्हा होलीनं हूड उघडून पाहिलं तेव्हा तिच्या आश्चर्याला पारावर उरला नाही कारण त्यात गवत अंथरुन ठेवलं होतं. या गवतात २०० हून अधिक अक्रोड खारुताईनं साठवून  ठेवले होते. 

परसिक दाम्पत्यांनं याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे जो सध्या  तुफान व्हायरल होत आहे. 

साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार ओल्गा टोकारझूक आणि पीटर हांडकेंना