पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुझी लायकी दाखवते! काँग्रेस आमदाराकडून महिला IPS अधिकाऱ्याला धमकी

आमदार आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

काँग्रेस महिला आमदार आणि परीक्षाविधीन आयपीएस अधिकारी यांच्यात वाद झाल्याची घटना समोर येत आहे. नेता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात महिला आमदाराने प्रशिक्षित आयपीएएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचे पाहायला मिळते. छत्तीसगडमधील कसडोलच्या काँग्रेस महिला आमदाराने तुला तुझी लायकी दाखवून देईन, अशा भाषेत महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावले. यावेळी वातावरण चांगलेच तापले होते. 

VIDEO: एकमेकांचा पाठलाग करत काँग्रेस कार्यकर्त्यांची हाणामारी

एका मजदूराच्या मृत्यूनंतर त्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी सुरु असलेल्या आंदोलनावेळी हा प्रकार घडला. काँग्रेसच्या आमदार शकुंतला साहू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु होते. याची माहिती मिळताच परीक्षाविधीन आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा घटनास्थळी पोहचल्या. यावेळी नेता आणि पोलिस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. शकुंतला साहू यांनी तुझी औकात दाखवून देईन, अशी भाषा वापरली. तुम्ही माझ्या लायकीवर जाऊ नका मॅडम! अशा शब्दांत महिला अधिकाऱ्यानेही आमदाराला बजावले.  

भीमा-कोरेगावः सर्व आरोपींना एनआयए कोर्टासमोर हजर

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बलोदाबाजामध्ये बुधवारी सिमेंट कारखान्यात झालेल्या अपघातात एका मजदूराचा मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी, यासाठी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. कारखान्याच्या मालकाने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केल्याने कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यविधी आटोपला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Woman Congress MLA Shakuntala Sahu insults the female IPS officer Ankita Sharma in Chhattisgarh