पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यूपीमध्ये महिलेला खाटेला बांधून जाळले; बलात्कार झाल्याचा संशय

उत्तर प्रदेशमध्ये महिलेला जाळले

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला खाटेला बांधून जाळल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनोरच्या गजरोल गावाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बलात्कारानंतर महिलेची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर तिला जाळले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

'विद्यापीठे ही फक्त वीटा-मातीपासून तयार झालेली नाहीत'

गजरोल येथील शिव आणि झलरा गावाच्या मध्ये नोएडा येथे राहणाऱ्या विश्वंभर यांची आंब्याची बाग आहे. शिव गावातील गजंफर अली या आंब्याच्या बागेत काम करत होते. शुक्रवारी संध्याकाळी गजंफर अली आंब्याच्या बागेल गेले होते. त्याठिकाणी एका खाटेसह एका व्यक्तीला जीवंत जाळल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली.

'इतिहासावर चर्चा करण्यापेक्षा आताच्या विषयांवर चर्चा करा' 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत महिलेची ओळख पटलेली नाही. घटनास्थळाजवळच पोलिसांना एक जिवंत काडतूस सापडले. त्यावरूनच पोलिसांनी असा अंदाज लावला आहे की, गोळ्या झाडून महिलेची हत्या करण्यात आली असावी आणि त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आले असावे. महिलेची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

'सावरकरांचा विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवा'