पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रेयसीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या प्रियकराकडून तिचाच खून

प्रातिनिधिक छायाचित्र

वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त आपल्या प्रियकरासोबत दिल्लीनजीक अलिपूरमध्ये एका हॉटेलात गेलेल्या तरुणीचा तिच्याच प्रियकराने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. प्रेयसीचा खून केल्यावर आरोपी प्रियकर तेथून पळून गेला. दिल्ली पोलिसांनी त्याला अलिपूरमधून अटक केली. विक्की मान असे या प्रियकराचे नाव आहे.

..म्हणून अजित पवारांनी मागितली माफी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की मान याने पोलिसांना सांगितले की त्या दिवशी रात्री हॉटेलात दोघेही जण मद्यपान करीत असताना अचानक त्याच्या प्रेयसीने त्याच्या कानशिलात लगावली. काहीही कारण नसताना तिने मला मारल्याचे विक्की मान याने पोलिसांना सांगितले. विक्की मान यानेही तिच्या कानशिलात लगावली आणि आपल्या हातातील मद्याचा ग्लास तिच्यावर भिरकावला. यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये गळा कापून विक्की मान याने त्याच्या प्रेयसीचा खून केला आणि तो तेथून पळून गेला.

मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसांची नवी ओळख महाराष्ट्राचा सेवक

हॉटेलमधील रुममध्ये बेडवर संबंधित तरुणीचा मृतदेह पडल्याचे कर्मचाऱ्यांना दिसल्यावर त्यांनी लगेचच पोलिसांना माहिती दिली. महिलेच्या तोंडातून आणि नाकातून रक्त बाहेर आल्याचे घटनास्थळी पोलिसांना दिसले. सोशल मीडियावर या दोघांची एकमेकांशी ओळख झाली होती. त्यातूनच त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि ते एकमेकांना भेटू लागल्याचे पोलिसांनी सांगितले.