पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशांच्या ठेवणीला राष्ट्रीय दर्जा द्या, काँग्रेसची मागणी

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या धाडसाचा उल्लेख आज (सोमवार) लोकसभेत झाला. लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी विंग कमांडर यांचे कौतुक करत त्यांच्या साहसाला आणि शौर्याला वीरता पुरस्कार दिला जावा अशी मागणी केली. त्याचबरोबर अभिनंदन यांच्या मिशांच्या ठेवणीला राष्ट्रीय दर्जा द्यावा असेही त्यांनी म्हटले. 

अभिनंदन यांच्या धाडसाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. यासाठी त्यांना पुरस्कार मिळायला हवा. त्यांच्या मिशांच्या ठेवणीला राष्ट्रीय दर्जा मिळायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. अभिनंदन यांच्या मिशांची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. 

 

मोदी योगासनाला मीडिया इव्हेंट बनवत आहेत, दिग्विजय सिंह यांचा टोला

पाकिस्तानमध्ये ३ दिवस कैदेत राहिल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांचे अटारी सीमेवर स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे एफ १६ हे लढाऊ विमान जमीनदोस्त केले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Wing Commander Abhinandan Varthaman moustache should be made national moustache Demands Comngress in Lok sabha