पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐतिहासिक निर्णय, अर्थमंत्र्यांच्या पाठीवर मोदींकडून शाबासकीची थाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कॉर्पोरेट कर कमी करण्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वागत केले. देशातील १३० कोटी नागरिकांसाठी हा लाभदायी निर्णय असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. निर्मला सीतारामन यांच्या घोषणानंतर काही वेळातच नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले.

नरेंद्र मोदींचे स्वागत... आणि दिलगिरीही, तुलसी गबार्ड यांचा संदेश

आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, कॉर्पोरेट कर कमी करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. यामुळे मेक इन इंडियाला उभारी मिळणार आहे. त्याचबरोबर खासगी गुंतवणुकीला चालना मिळणार असून, देशातील खासगी उद्योजकांना आपली स्पर्धात्मक क्षमता वाढविता येईल. यामुळे अधिक रोजगार निर्मिती होणार असून, देशातील १३० कोटी नागरिकांसाठी हा लाभदायी निर्णय आहे. 

गेल्या काही दिवसांत सरकारने घेतलेल्या निर्णयामधून हेच दिसून आले आहे की व्यवसाय करण्यासाठी भारताला सर्वोत्कृष्ट ठरविण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्नशील आहोत. भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

VIDEO: भाजप नेत्याने पक्ष कार्यालयाबाहेर पत्नीला केली मारहाण

तत्पूर्वी निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने काही उपाययोजनांची शुक्रवारी सकाळी घोषणा केली. यामध्ये प्रामुख्याने कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.