पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर

नोबेल २०१९

वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेचे संशोधक  विल्यम केलीन ज्युनियर, सर पिटर जे रॅटक्लिफ आणि ब्रिटनचे ग्रेग सेमेन्झा या तिघांना विभागून नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. कोशिकांच्या प्राणवायू ग्रहणावर त्यांनी केलेल्या सखोल संशोधनासाठी त्यांची नोबेल पुरस्कारासाठी  निवड करण्यात आली.

राष्ट्रवादीला धक्का, अवघ्या ३ दिवसांत आमदार घोडा पुन्हा शिवसेनेत

दिवाळीत फटाके फोडू नका; प्रकाश जावडेकरांचा दिल्लीकरांना सल्ला

'प्राणवायूची शरीरातील मात्रा ही कशाप्रकारे पेशी, चयापचय क्रिया आणि  शारीरिक हालचालींवर परिणाम  करते हे आपल्याला समजून घेता यावं यासाठी  तिघांनी केलेल्या संशोधनाची आपल्याला नक्की मदत होईल अशी प्रतिक्रिया ज्युरींनी दिली आहे. त्यांनी केलेल्या संशोधनाचा अॅनिमिया, कॅन्सर आणि इतर आजारांनी लढा देण्यासाठी आपल्याला नक्कीच उपयोग होईल असंही ज्युरी म्हणाले. 

विल्यम केलीन ज्युनियर,  सर पिटर जे रॅटक्लिफ आणि ब्रिटनचे ग्रेग सेमेन्झा  या तिघांना ९, १८,००० डॉलर पुरस्काराची रक्कम म्हणून देण्यात आली आहे. ही रक्कम तिघांमध्ये विभागली जाणार आहे. १९०१ पासून नोबेल पुरस्कार दिला जात आहे. वैदयकीय क्षेत्रातला हा ११० वा पुरस्कार आहे. 

हा नोबेल पारितोषिक सप्ताह आहे. यावर्षी साहित्यातील दोन नोबेल पुरस्कार जाहीर होणार आहे. २०१८ मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी २०१८ आणि २०१९ वर्षांतले  दोन नोबेल पुरस्कार १० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. तर  शांततेचा नोबेल पुरस्कार हा ११ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार १४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.