पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैन म्हणतो, मी शरण येण्यास तयार

ताहिर हुसेन

दिल्लीच्या ईशान्य भागात झालेल्या हिंसाचार प्रकरणी तपासासाठी आपण पोलिसांपुढे शरण येण्यास तयार आहोत, असे आम आदमी पक्षातून निलंबित केलेले नगरसेवक ताहिर हुसैन यांनी म्हटले आहे. शरण येण्यासाठी आपण न्यायालयाकडे अर्जही दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्राकडून पीएफवरील व्याज दरात घट; ६ कोटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका

इंडिया टुडे वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ताहिर हुसैन म्हणाले, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. २४ फेब्रुवारीला मी खूप वेळा पोलिसांना फोन केला. त्याचदिवशी मी त्या भागातून निघून गेलो. त्या भागात २५ फेब्रुवारीला हिंसाचार भडकला होता. आता माझ्याकडे पोलिसांपुढे शरण येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही, असेही त्यांनी सांगितले.

माझ्यावर नार्को किंवा इतर कोणत्याही चाचण्या करायला हरकत नाही. मी सर्व चाचण्यांना सामोरा जायला तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या आपण दिल्लीजवळच एका ठिकाणी राहतो आहोत. २४ फेब्रुवारीला पोलिसांच्या मदतीनेच मी त्या भागातून निघून आलो, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनातून बरा झालेल्या पेशंटला पुन्हा या विषाणूची लागण होते का?

ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारात गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा मारले गेले होते. चांदबागमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. अंकित शर्मा यांच्या कुटुंबियांनी ताहिर हुसैन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ताहिर हुसैन यांनी जमावाला चिथावल्यामुळेच त्यांनी अंकित यांची हत्या केली, असा कुटुंबियांचा आरोप आहे.