पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'... माझ्या मतदारसंघातील लोक ममतांना 'गेट वेल सून' कार्ड पाठवणार'

बाबूल सुप्रियो

लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील वादविवाद संपण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते ममता बॅनर्जी यांच्यासमोर 'जय श्रीराम' घोषणा देत असल्याचे सोशल मीडियातील व्हिडिओत दिसले होते. तर दुसरीकडे भाजपच्या काही कचेऱ्यांवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी AITC असे आपल्या पक्षाचे नाव लिहिल्याचे दिसून आले. खुद्द ममता बॅनर्जी यासुद्धा एका कचेरीवर AITC लिहित असल्याचे एका व्हिडिओत बघायला मिळाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी ममता बॅनर्जी यांची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्या भाजपला घाबरतात, असे मत त्यांनी मांडले.

'जय श्री राम' या घोषणेतून भाजप धर्म अन् राजकारण एकत्र करत आहे : ममता

बाबूल सुप्रियो यांनी म्हटले आहे की, ममता बॅनर्जी या अनुभवी राजकीय नेत्या आहेत. पण त्यांची सध्याची वर्तणूक सामान्य नसून विचित्र आहे. आपण कोणत्या पदावर काम करतोय, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. काही दिवसांसाठी त्यांनी विश्रांती घ्यायला हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एएनआयने हे ट्विट केले आहे.
जर एखाद्या धार्मिक कार्यक्रमात जय श्रीरामची घोषणा दिली गेली तर मला काहीच हरकत नाही. पण भाजप राजकारण आणि धर्म एकत्र करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

... आणि ममता बॅनर्जी यांनी निर्णय फिरवला

आपल्या आसनसोल मतदारसंघातून लोक ममता बॅनर्जी यांना लवकर बऱ्या व्हा (गेट वेल सून) अशा आशयाचे पत्र पाठविणार आहेत, असे बाबूल सुप्रियो यांनी म्हटले आहे. बाबूल सुप्रियो याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.