पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साध्वी प्रज्ञांना मी कधीच माफ करु शकणार नाहीः मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PTI)

महात्मा गांधा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी जरी माफी मागितली असली तरी मी त्यांना कधीच माफ करु शकणार नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख साध्वी प्रज्ञा यांच्याकडेच होता. एका खासगी वाहिनीली दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, गांधीजी किंवा गोडसेबाबत जे वक्तव्य करण्यात आले ते अत्यंत वाईट होते आणि समाजासाठी ते अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी माफी मागितली ही वेगळी गोष्ट आहे. पण मी त्यांना माझ्या मनापासून कधी माफ करु शकणार नाही. 

नथुराम गोडसे देशभक्त होते आणि राहणारचः प्रज्ञासिंह ठाकूर

अशा देशभक्तापेक्षा देशद्रोही म्हणून घेणं अभिमानाचं- मेहबुबा मुफ्ती

देवास लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेंद्र सोलंकी यांच्या प्रचारानिमित्त आयोजित रोड शोमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना प्रज्ञासिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. नथुराम गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्त राहतील, असे त्यांनी म्हटले होते. जे लोक नथुराम यांना दहशतवादी म्हणत आहेत. त्यांनी पहिल्यांदा आत्मपरिक्षण करावे. अशा लोकांना या निवडणुकीत योग्य उत्तर मिळेल, असेही त्यांनी म्हटले होते. भाजपने प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यावर आपले हात झटकले होते. भाजप प्रज्ञासिंह यांच्या मताशी सहमत नसून त्यांनी याप्रकरणी लोकांची माफी मागितली पाहिजे, असे पक्षाने म्हटले होते. त्यानंतर प्रज्ञासिंह यांनीही माफी मागितली होती. मात्र, त्यानंतरही प्रज्ञासिंह आणि भाजप विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी प्रचारसभांमधून हाच मुद्दा प्रामुख्याने समोर आणला आहे.  

'बापूंचा खून करणारा देशभक्त? हे राम!'