पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३ मे नंतरही लॉकडाऊन?, अनेक राज्ये कालावधी वाढण्यास तयार

अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा पहिला लॉकडाऊन २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत होता. १८ दिवसांचा दुसरा लॉकडाऊन ३ मे पर्यंत सुरु राहिल. याच दरम्यान आता सर्वांच्या मनात हाच प्रश्न उपस्थित झाला आहे की देशात तिसरा लॉकडाऊनही होईल का ? दरम्यान केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप कोणताच निर्णय आलेला नाही. परंतु, अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे पहिला लॉकडाऊन संपण्यापूर्वीही अनेक राज्यांनी अशाच पद्धतीने लॉकडाऊन वाढवण्याची शिफारस केली होती. केंद्र सरकारनेही सर्वांचा सल्ला ऐकत देशवासियांना ३ मे पर्यंत घरात राहण्यास सांगितले होते. 

धीरज आणि कपिल वाधवान सीबीआयच्या ताब्यात: गृहमंत्री

या राज्यांनी केले आवाहन

महाराष्ट्रासह सहा मोठ्या राज्यांनी लॉकडाऊन ३ मेच्या पुढे वाढवण्याची इच्छा जाहीर केली आहे. दिल्ली सरकारने लॉकडाऊन १६ मेपर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिशाने आपल्या राज्यातील हॉटस्पॉटवरील निर्बंध ३ मेनंतरही कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. तर तेलंगणातील लॉकडाऊनला आधीच ७ मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. 

या राज्यांना पंतप्रधानांच्या निर्णयाची प्रतीक्षा

हरयाणा, हिमाचल प्रदेश, तामिलनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातने म्हटले की, ते केंद्र सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या दिशा-निर्दशाची वाट पाहत आहोत. केंद्र सरकार जे सांगेल, त्याची अंमलबजावणी करु असे त्यांनी म्हटले आहे. तर बिहार, आसाम, केरळ सरकारने सोमवारी पंतप्रधानांबरोबरील चर्चेनंतर लॉकडाऊनवर निर्णय घेऊ असे म्हटले. 

संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, CM ठाकरेंची टीका

काही राज्यांना मिळू शकते सवलत

मिळालेल्या माहितीनुसार, सरकार यावेळी लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारांवर सोडण्याची शक्यता आहे. ज्या राज्यात कमी प्रकरणे आहेत. तिथे सवलत दिली जाऊ शकते. पण त्यासाठी सोशल डिस्टन्सिग आणि मास्क आदीची अनिवार्यता कायम राहिल.