पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमलनाथ राजीनामा देण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ

गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आता एका निर्णायक वळणावर आल्याचे चित्र आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आज दुपारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता माध्यमांच्या प्रतिनिधींना आपल्या निवासस्थानी बोलावले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गूड न्यूज : भारतात कोरोना विषाणूचे संक्रमण तुलनेत तूर्त कमी

काँग्रेसच्या २३ आमदारांनी बंडखोरी करीत आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये कमलनाथ यांच्या सरकारमधील सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील हे आमदार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या आमदारांनी राजीनामे दिले होते. या घटनेनंतर मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांचे सरकार अडचणीत आले आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या अध्यक्षांनी या आमदारांचे राजीनामे मंजूर केले आहेत. त्यामुळे या स्थितीत कमलनाथ यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

निर्भयाच्या दोषींना फाशी

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशात कमलनाथ सरकारला शुक्रवारी आपले बहुमत विधानसभेत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे काँग्रेसच्या आमदारांनी दिलेले राजीनामे आणि दुसरीकडे बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश यामुळे कमलनाथ आज राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ शकतात.