पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर मोदी स्वतः फाशी घेणार का?, मल्लिकार्जुन खर्गेंचा वादग्रस्त प्रश्न

नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष काँग्रेसला ४० पेक्षा कमी जागा मिळतील, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्यावर वादग्रस्त टीका केली. जर काँग्रेसला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर नरेंद्र मोदी दिल्लीत विजय चौकात स्वतः फाशी घेणार का, असा प्रश्न खर्गे यांनी विचारला. कर्नाटकमधील एका जाहीर सभेत खर्गे यांनी हा वादग्रस्त प्रश्न विचारला.

लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची : प्रियांका गांधी

कर्नाटकमधील चिंचोली विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार सुभाष राठोड यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खर्गे म्हणाले, इथे बसलेले लोकच या देशाचे भविष्य आणि नशीब ठरवणार आहेत. सुभाष राठोड आणि काँग्रेस पक्ष यांचे भविष्य ठरविणेही तुमच्या हातात आहे. त्यांच्या (भाजप) हातात नाही. नरेंद्र मोदी सध्या जिथे कुठे जातात, तिथे काँग्रेसला ४० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे सांगतात. तुमच्यापैकी कोणीही यावर सहमत आहात का?, जर आम्हाला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर नरेंद्र मोदी स्वतःला विजय चौकामध्ये फाशी लावून घेणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

मोदी जरी ते मागासवर्गातून आले आहेत, असे सांगत असले, तरी ते केवळ श्रीमंतांसाठीच काम करत आहेत, असा आरोप खर्गे यांनी केला. देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मोदींचा जन्मही झाला नव्हता, असेही खर्गे म्हणाले. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४४ जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, भाजपने खर्गे यांच्या वक्तव्यावर तीव्र टीका केली. खर्गे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी पक्षाच्या कर्नाटकमधील नेत्या आणि खासदार शोभा करंदलाजे यांनी केली आहे. खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा वक्तव्याची कधीच अपेक्षा नव्हती, असेही त्यांनी म्हटले आहे.

दहशतवाद्यांना मारण्यासाठी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी मागायची का?, मोदींचा सवाल

धडधाकट खोटे बोलणे, खोटेनाटे आरोप करणे, अपशब्द वापरणे, हे सगळं काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार केलं जाऊ लागलं आहे. विकासाचं ते काहीच सांगत नाही. त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, असे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.