पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देऊ, पाकिस्तानची नरमाईची भूमिका

कुलभूषण जाधव

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तान आपली भूमिका काहीशी मवाळ केली असून, तेथील कारागृहात असलेल्या कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देऊ, असे म्हटले आहे. पाकिस्तानी कायद्याप्रमाणे आणि व्हिएन्ना कराराला बांधिल राहून आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत कुलभूषण जाधव यांना मिळवून दिली जाईल, असे पाकिस्तानने गुरुवारी रात्री उशीरा प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने हे निवेदन जारी करण्यात आले. कुलभूषण जाधव यांनाही याबद्दल माहिती देण्यात आली असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. या निवदेनात लिहिले आहे की, एक जबाबदार देश म्हणून पाकिस्तानी कायद्याप्रमाणे कुलभूषण जाधव यांना आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत मिळवून दिली जाईल. ही मदत कशी मिळवून द्यायची यासाठीचे नियोजन केले जात आहे.

पाकिस्तानने व्हिएन्ना करारचे उल्लंघन केले असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या निकालात म्हटले होते. कुलभूषण जाधव यांना त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कायदेशीर मदत मिळवून द्यायला हवी होती. तसे न करताच पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर हा मुद्दा भारताकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यात आला. न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेला दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे. त्याचबरोबर त्यांना कायदेशीर मदत पुरविण्याचे निर्देश पाकिस्तानला दिले आहेत. 

... अखेर अजित पवार यांचा यू-टर्न

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकाल हा भारताच्या युक्तिवादाचा विजय मानण्यात येतो आहे. यानंतर आता कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्याचे पाकिस्तानने जाहीर केल्यामुळे भारताला आणखी एक यश मिळाले आहे.