पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आश्रितांना राहू देऊ आणि घुसखोरांना हाकलू - अमित शहा

अमित शहा

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यात भितीचे वातावरण पसरवित आहेत. पण घाबरण्याचे कारण नाही. हिंदू, शीख आणि जैन समाजातील आश्रित लोकांना मग ते कोणत्याही राज्यात असू दे. त्यांना देश सोडून जावे लागणार नाही, असेही अमित शहा यांनी स्पष्ट केले. 

भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

अमित शहा म्हणाले, गैरमुस्लिम असलेल्या कोणत्याही आश्रित नागरिकांना भाजप कधीही देश सोडून जाण्यासाठी बळजबरी करणार नाही. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीनंतर राज्यातील लाखो हिंदूंना देश सोडून जावे लागेल, अशी भीती ममता बॅनर्जी दाखवत आहेत. पण हे धादांत खोटे आहे. आणि हे सांगण्यासाठीच आज मी इथे आले आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार रमेश कदमांना जामीन मंजूर; मोहोळमधून अपक्ष निवडणूक लढवणार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर पहिल्यांदाच अमित शहा पश्चिम बंगालमध्ये आले होते. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी जागृती अभियानात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. घुसखोरी करून आलेल्या एकाही व्यक्तीला आम्ही इथे राहू देणार नाही. पण आश्रितांना अजिबात इथून जाऊन देणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.