पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेहुल चोक्सीला लवकरच भारताकडे सोपवू, एंटीगुआच्या पंतप्रधानांची स्पष्टोक्ती

मेहुल चोक्सी

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्सी याला लवकरच भारताच्या स्वाधीन केले जाईल. एंटीगुआचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी मेहुल चोक्सी याचे तेथील नागरिकत्व रद्द केले जाईल आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला भारताच्या स्वाधीन केले जाईल, असे म्हटले असल्याचे तेथील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे.

राज्यसभा पोटनिवडणूक: गुजरातमधील काँग्रेस नेत्यांची याचिका फेटाळली

नोव्हेंबर २०१७ मध्ये मेहुल चोक्सी याला एंटीगुआ आणि बार्बुडा यांचे नागरिकत्व बहाल करण्यात आले होते. जगातील श्रीमंत लोकांना या देशाकडून नागरिकत्व बहाल केले जाते. त्याअंतर्गत मेहुल चोक्सी याला हे नागरिकत्व देण्यात आले होते. एंटीगुआच्या नागरिकत्व बहाल करण्याच्या या पद्धतीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
गॅस्टन ब्राऊन म्हणाले, मेहुल चोक्सी याला नागरिकत्व देण्यात आले होते. पण ते आता रद्द करण्यात आले आहे. लवकरच त्याला भारताच्या स्वाधीन केले जाईल. आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्यांना आमच्या देशात कोणत्याही स्थितीत थारा दिला जाणार नाही. 

आणीबाणीत संघर्ष करणाऱ्यांना पंतप्रधानांचा सलाम

दरम्यान, केंद्र सरकारने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. आम्हाला अधिकृतपणे काहीही माहिती नाही, असे सरकारने म्हटले आहे. 

१३४०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयकडून मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.