पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींचे ट्विटरवर १ कोटी फॉलोअर्स, अमेठीत करणार जल्लोष

राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी पहिल्यांदाच एक आनंदाची बातमी आली आहे. ट्विटरवरील राहुल गांधी यांच्या फॉलोअर्सची संख्या एक कोटीवर जाऊन पोहोचली आहे. खुद्द राहुल गांधी यांनी याबद्दल फॉलोअर्सचे आभार मानले आहेत.

एक कोटी फॉलोअर्स झाल्यानिमित्त बुधवारी सकाळी लिहिलेल्या एका ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, एक कोटी ट्विटर फॉलोअर्स...प्रत्येकाचे आभार. आज अमेठीच्या दौऱ्यावर असल्याने तिथेच याचा आनंद साजरा केला जाईल. अमेठीमध्ये काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची आज भेट घेणार आहे. 

भाजपला २०१६ ते १८ मध्ये काँग्रेसपेक्षा १६ पट अधिक देणग्या

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी २५ मे रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी याबद्दल त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली होती. त्याच्या त्या ट्विटला ७००० जणांनी लाईक केले होते. तर १२०० हून अधिक जणांनी ते ट्विट रिट्विट केले होते. 

याच दिवशी राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील वैयक्तिक माहितीमध्येही बदल केला होता. काँग्रेसचे अध्यक्ष ही माहिती काढून त्यांनी काँग्रेसचा सदस्य एवढीच माहिती ठेवली होती.