पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व विधेयकाला विरोध करणारे पक्ष पाकिस्तानचीच भाषा बोलताहेत - नरेंद्र मोदी

भाजप संसदीय पक्षाची बैठक (फोटो - विपीन कुमार)

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करणारे पक्ष पाकिस्तानचीच भाषा बोलत असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा महिन्यांत पक्षाने घेतलेले सर्व महत्त्वाचे निर्णय प्रत्यक्षात आल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर ते सोनेरी अक्षरांनी लिहिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेकडे गृह, नगरविकास; राष्ट्रवादीकडे अर्थ, गृहनिर्माण, घोषणा लवकरच

लोकसभेत मंजूर झाल्यानंतर नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी दुपारी १२ वाजता राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकावर आजच चर्चा होणार असून, ते मंजूर करून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांतून आलेल्या अल्पसंख्यकांना या विधेयकाच्या मंजुरीनंतर मोठा दिलासा मिळणार आहे. 

नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत बुधवारी दुपारी १२ वाजता मांडले जाईल आणि पुरेशा पाठिंब्यासह ते या सभागृहात मंजूर केले जाईल, असा विश्वास संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला आहे. 

बॅनर्जी यांनी खास भारतीय पोशाखात स्वीकारला नोबेल पुरस्कार!

भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला बुधवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रेल्वेमंत्री पियूष गोयल, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी हे सर्व नेते उपस्थित होते.