पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अपात्र ठरविण्याविरोधात बंडखोर आमदार सुप्रीम कोर्टात जाणार

जेडीएसचे बंडखोर आमदार ए एच विश्वनाथ

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे ठरविले आहे. एकूण १४ जणांना अध्यक्षांनी रविवारी अपात्र ठरविले आहे. सध्याच्या विधानसभेची मुदत संपेपर्यंत त्यांना निवडणूक लढविता येणार नाही, असेही अध्यक्षांनी सांगितले आहे. आता विधानसभेतील हा वाद सर्वोच्च न्यायालयात जाणार हे स्पष्ट झाले आहे.

आता शशी थरूर यांचा काँग्रेसला घरचा अहेर!

काँग्रेसच्या ११ आणि जेडीएसच्या ३ बंडखोर आमदारांना अध्यक्षांनी रविवारी अपात्र घोषित केले. या आमदारांनी बंडखोरी करीत आधीच आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पण तो अध्यक्षांनी स्वीकारला नव्हता. गेल्या आठवड्यातच बंडखोरांमुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यात अपयशी ठरले होते. त्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आली असून, बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

जेडीएसचे बंडखोर आमदार ए एच विश्वनाथ म्हणाले, अध्यक्षांना निर्णय बेकायदा आहे. मी आणि इतर सर्व आमदार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. सोमवारीच आम्ही याचिका दाखल करणार आहोत. केवळ व्हीप जारी केले म्हणून तुम्ही आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्याची बळजबरी करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. 

दुष्काळ : बीडमधील शेतकरी संकटात, पीक कापणीला येण्यापूर्वीच मोडणी

गेल्या गुरुवारी अध्यक्षांनी काँग्रेसच्या तीन आमदारांना अपात्र ठरविले होते. आतापर्यंत एकूण २० आमदारांना व्हीप जारी झाल्यानंतरही सभागृहात उपस्थित न राहिल्याबद्दल अपात्र ठरविण्यात आले आहे.