पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...

काँग्रेस खासदर हिबी इडन आणि यांच्या पत्नी अॅन्ना इडन (Photo: @HibiEden/Twitter)

केरळमधील एर्नाकुलमचे काँग्रेस खासदर हिबी इडन यांच्या पत्नी अ‍ॅन्ना इडन यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे सोशल मीडियावर एकच हल्लकल्लोळ माजला आहे. अॅन्ना इडन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नशीब बलात्कारासारखं आहे, जर तुम्ही ते रोखू शकत नाही तर त्याची मजा घ्या. आपल्या या पोस्टमुळे वाद निर्माण होताच त्यांनी त्वरीत आपली फेसबुक पोस्ट डिलिट केली आणि खुलासाही जारी केला. 

Infosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले

अ‍ॅन्ना लिंडा इडन यांनी सोमवारी एक पोस्ट केली, त्यामध्ये कोच्ची येथे अचानक आलेल्या पुराचे छायाचित्र त्यांनी दाखवले आहे. या पोस्टमध्ये खासदार हिबी इडन काहीतरी खाताना दिसत आहेत. या फोटोबरोबर त्यांनी एक ओळ लिहिली, नशीब बलात्काराप्रमाणे आहे, जर तुम्ही ते रोखू शकला नाहीत तर त्याची मजा घ्या. या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्या चांगल्याच ट्रोल झाल्या. 

पीओकेत आंदोलकांवर लाठीचार्ज, दोघांचा मृत्यू

सोशल मीडियावर अ‍ॅन्ना इडन यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात येत आहे. सोशल मीडियावर #SayNoToRapeJokes आणि #EndRapeJokeFIlth सारखे हॅशटॅग चालवण्यात आले. अ‍ॅन्ना यांच्या पोस्टमुळे बलात्कार पीडित आणि त्यांच्या कुटुंबाला वेदना दिल्या आहेत, असे लोकांनी लिहिले आहे. आपल्या या पोस्टवर चहूबाजूंनी टीका होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ती पोस्टच डिलीट केली आणि यावर स्पष्टीकरणही दिले. 

मल्याळम भाषेत लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये अ‍ॅन्ना यांनी लिहिले की, मी खरंच एका कठीण काळातून जात होते. मी त्या पीडित महिलांची थट्टा करत नव्हते. मी खरंच खूप दुःखी आहे की माझ्या पोस्टमुळे अशी स्थिती निर्माण झाली. मी यासाठी माफी मागते. आपल्या शाळेच्या काळातील एका अभिनेत्याचा डायलॉग लिहिला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

दिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा