पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बायको घरात नाही, स्वयंपाक करायला येते का?; प्राध्यापकांचा मध्यरात्री विद्यार्थिनीला मेसेज

जी बी पंत विद्यापीठ

बायको घरात नाही म्हणून एका प्राध्यापकाने थेट मध्यरात्री वसतिगृहातील विद्यार्थिनीला फोन केला आणि तिला घरी स्वयंपाक करण्यास बोलावल्याची धक्कादायक घटना जी बी पंत विद्यापीठात समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनीने केवळ लेखी तक्रार दिलेली नाही म्हणून संबंधित प्राध्यापकाविरुद्ध कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही, असे पंत विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. सलील तिवारी यांनी सांगितले.

'शिवसेनेचा मुख्यमंत्री २५ वर्षे राहिल, पण मी पुन्हा येईन म्हणणार नाही'

संबंधित विद्यार्थिनीने विद्यापीठाच्या एका समितीमध्ये थेट कुलगुरूंसमोरच हा मुद्दा उपस्थित केला. पण तिने लेखी तक्रार दिलेली नाही. तिने कुलगुरुंना सांगितले की संबंधित प्राध्यापक रात्रीच्या वेळी तिला फोन करतात जर तिने कॉल कट केला तर ते पुन्हा तिला फोन लावतात. एकेदिवशी त्यांनी मला मध्यरात्रीनंतर फोन केला आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एक मेसेज पाठवून मला विचारले की, माझ्या घरी बायको नाही. माझ्यासाठी जेवण कोण शिजवेल. तू येते का?

नव्या आघाडीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच यावर शिक्कामोर्तब, पण...

संबंधित विद्यार्थिनीने मोबाईलमधील हा मेसेज कुलगुरुंना दाखवला. पण त्यांनी तो पाहून सुद्धा संबंधित प्राध्यापकांवर कोणतीच कारवाई केली नाही. ज्यावेळी ही घटना घडली. त्यावेळी संबंधित प्राध्यापक हे वसतिगृहाचे रेक्टर होते. पण ही घटना घडल्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांना या पदावरून हटविण्यात आले आहे, असे विद्यापीठाने सांगितले.