पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपले झुबे पतीने गर्लफ्रेंडला दिले म्हणून पत्नीकडून घटस्फोटाची मागणी

प्रातिनिधिक छायाचित्र

आपले झुबे नवऱ्याच्या गर्लफ्रेंडच्या कानात दिसल्यामुळे एका महिलेने पतीकडे घटस्फोट मागितला आहे. आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचा संशय मला आधीपासूनच होता, असे या प्रकरणातील घटस्फोट मागणाऱ्या पत्नीने म्हटले आहे. जेव्हा माझेच झुबे घातलेल्या महिलेचा फोटो नवऱ्याच्या मोबाईलमध्ये बघितल्यावर माझा नवऱ्याचा विश्वास पूर्णपणे उडाला, असे या पत्नीने घटस्फोटपूर्व कौटुंबिक समुपदेशन केंद्रात सांगितले.

#ICC WC : कर्णधार कोहलीची धोनीसाठी बॅटिंग

नीलम आणि अभिषेक (दोन्ही नावे बदललेली) यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. अभिषेक दिल्लीमध्ये एका खासगी कंपनीमध्ये काम करतो. लग्नाच्या सुरुवातीपासूनच अभिषेकचे बाहेर कोणत्यातरी महिलेशी संबंध असल्याचा संशय नीलमला होता. अनेकवेळा नवरा कोणाशी तरी चोरून बोलतोय, हे मी ऐकलेही होते, असे तिने सांगितले. लग्नानंतर तीन महिन्यांनी नीलमने अभिषेकला कोणाशीतरी चोरून बोलताना पकडलेही होते. पण त्यावेळी अभिषेकने ती माझ्या कामावरील सहकारी आहे आणि आम्ही कामासंदर्भात बोलत असल्याचे नीलमला सांगितले. यानंतर १५-२० दिवसांनी पुन्हा एकदा अभिषेकच्या व्हॉटसऍपवर कोणत्यातरी महिलेचा संदेश पाहून नीलम चिडली होती. यानंतर दोघांमध्ये जोराचे भांडण झाले. त्यामुळे नीलम तिच्या माहेरी निघून गेली. 

एक महिन्यानंतर अभिषेक त्याच्या सासरी गेला आणि त्याने नीलमजवळ आपली चुकी मान्य केली. यापुढे कोणत्याही महिलेशी बोलणार नाही, असे म्हणून त्याने नीलमला पुन्हा एकदा घरी आणले. नीलम तिच्या माहेरी असताना तिच्या आईने तिला झुबे भेट म्हणून दिले होते. सासरी आल्यावर तिने कानातले झुबे काढून ठेवून दिले होते. यानंतर हेच झुबे अभिषेकने त्याच्या गर्लफ्रेंडला दिल्याचा आरोप नीलमने केला. अभिषेकच्या मोबाईलमधील एका फोटोत महिलेच्या कानात तेच झुबे असल्याचे पाहून नीलमला राग अनावर झाला. 

संघ 'डिजिटल'!, मोहन भागवतांसह अनेक नेते टि्वटरवर

या घटनेनंतर नीलम पुन्हा एकदा माहेरी आली आणि तिने पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, समुपदेशान केंद्रातील अधिकारी विधू गर्ग यांनी सांगितले की, पहिल्या फेरीमध्ये नीलम आणि अभिषेकमध्ये सामंजस्याने हा प्रश्न सोडविता आलेला नाही. त्यांना पुन्हा एकदा समुपदेशानासाठी बोलाविण्यात येणार आहे.