पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...

लूडो शिकल्यानंतर पतीला तीन ते चार वेळा पत्नीकडून पराभव पत्करावा लागला.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन लागू आहे. पण या काळात घरगुती हिंसाचाराच्या घटना जवळपास ९५ टक्क्याने वाढल्या आहेत. घरामध्ये पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशातच एक धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे. लूडो खेळताना पत्नीकडून हारल्यामुळे पतीने तिला मारहाण केली. यामध्ये तिच्या पाठीच्या कण्याला मोठी दुखापत झाली. 

सर्व वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीस मंजुरी द्या; ऍमेझॉन, फ्लिपकार्टची मागणी

टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्या वृत्तानुसार, २४ वर्षांच्या पत्नीने आपल्या पतीला लूडोमध्ये सलग तीन ते चार वेळा हरविले. संबंधित महिला घरातच शिकवणी वर्ग चालवते. लॉकडाऊन असल्यामुळे तिचा पती घरातच होता. यावेळी पत्नीनेच पतीला लूडो कसे खेळायचे हे शिकवले. 

लूडो शिकल्यानंतर पतीला तीन ते चार वेळा पत्नीकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या संदर्भात गुजरातमधील समुपदेशन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलग हारल्यामुळे पतीचा स्वाभिमान दुखावला गेला. त्यातूनच हा सगळा प्रकार घडला असू शकतो.

Covid 19: मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला तर होणार कारावास

गुजरातमध्ये वडोदरात ही घटना घडली. या घटनेतील पती एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. या घटनेनंतर त्याने पत्नीची माफी मागितली. त्यानंतर पत्नीने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यास नकार दिला, अशी माहिती समुपदेशन केंद्राकडून मिळाली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:wife defeats husband in ludo game during lockdown man beats and breaks her spine at vadodara