पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजीसाठी ३० रुपये मागितले म्हणून पत्नीला तिहेरी तलाक!

प्रातिनिधिक छायाचित्र

भाजी आणण्यासाठी पत्नीने ३० रुपये मागितले म्हणून ग्रेटर नोएडातील दादरीमध्ये एका नवऱ्याने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजी आणण्यासाठी पत्नीने ३० रुपये मागितल्यावर दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली. याच भांडणातून चिडलेल्या पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी ही घटना घडली. दादरीमध्ये हे दाम्पत्य राहते. पतीचे नाव शबीर असून, पत्नीचे नाव झैनाब आहे. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. पत्नीने पती आणि सासरच्या लोकांविरोधात घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रारही दाखल केली आहे. 

भगव्या जर्सीमुळेच टीम इंडियाचा पराभवः मेहबुबा मुफ्ती

झैनाबने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी शबीर, त्याचे भाऊ झाकीर आणि इद्रिस, त्यांची बहिण समा आणि माझ्या सासुबाई नज्जो यांनी मला घरात मारहाण केली. यावेळी त्यांनी वायरच्या साह्याने मला इलेक्ट्रिक शॉकही दिला. माझ्या नवऱ्याने मला तीन वेळा तलाक म्हणत घराबाहेर काढले, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

झैनाबच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडल्यावर माझ्या बहिणीने घरच्यांना फोन केला. आम्ही जेव्हा तिच्या घरी गेलो, त्यावेळी तिला मारहाण झाल्याचे आम्हाला दिसले. आम्ही लगेचच तिला रुग्णालयात घेऊन गेलो. त्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

'काँग्रेसच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा द्यावा'

दादरी पोलिस ठाण्यातील अधिकारी नीरज मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शबीर आणि त्याच्या घरच्या मंडळींविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आम्ही शबीरला अटक करून त्याला महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले होते. ३० जून रोजी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. कुटुंबातील इतर सदस्य बेपत्ता आहेत.