पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंदू महासभा नेत्याच्या हत्येप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक, विवाहबाह्य संबंध कारणीभूत

रणजीत बच्चन

विश्व हिंदू महासभेचे प्रमुख रणजीत बच्चन यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी एकूण तिघांना अटक केली. यामध्ये त्यांच्या दुसऱ्या पत्नीचाही समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. रणजीत बच्चन यांची रविवारी सकाळी हत्या करण्यात आली होती. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यावर अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यामध्ये त्यांचा भाऊ आदित्य श्रीवास्तव हे जखमी झाले आहेत.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७०० कोटींचे अतिरिक्त वाटप, हायकोर्टात माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत बच्चन आणि त्यांची दुसरी पत्नी स्मृती श्रीवास्तव यांच्यातील वादातून ही हत्या झाल्याचे तपासात दिसून आले आहे. स्मृती या राज्य सरकारच्या महसूल विभागात कार्यरत आहेत. या दोघांना चार वर्षांचे एक मूल असून २०१६ पासून ते वेगवेगळे राहत होते. 

लखनऊचे पोलिस आयुक्त सुजित पांडे म्हणाले, स्मृती श्रीवास्तव आणि दिपेंद्रकुमार यांच्यात प्रेमसंबंध होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. 

बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवादी प्रशिक्षण अड्डे कार्यरत

रणजीत बच्चन यांचे वेगवेगळ्या महिलांशी संबंध होते. त्यांनी १८ जानेवारी २०१५ मध्ये स्मृती श्रीवास्तव यांच्याशी त्यांनी लग्न केले. आपले हे पहिलेच लग्न असल्याची खोटी माहिती त्यांनी स्मृती यांना दिली होती. पण रणजीत बच्चन यांच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि इतर संबंधांबद्दल माहिती मिळाल्यावर स्मृती श्रीवास्तव यांनी रणजीत बच्चन यांच्यापासून लांब राहायला सुरुवात केली.