पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रम लँडरशी संपर्क का होऊ शकत नाही माहितीये? चांद्रयान १च्या प्रमुखांचा अंदाज

चांद्रयान २

चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचा शोध भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांना लागला आहे. तरीही विक्रम लँडरशी अद्याप संपर्क प्रस्थापित झालेला नाही. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर असल्याचे थर्मल इमेजच्या माध्यमातून दिसले आहे. चांद्रयान २ मधील ऑर्बिटरने हे फोटो काढले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नक्की विक्रम लँडरशी संपर्क का होऊ शकत नाही, याबद्दल चांद्रयान १ चे प्रमुख मलयस्वामी अण्णादुराई यांनी अंदाज वर्तविला आहे.

सांगलीः कृष्णा नदीची पातळी ३३ फुटांवर, एनडीआरएफच्या पथकाला पाचारण

अण्णादुराई यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लँडर नक्की कुठे आहे, याचा शोध आपल्याला लागला आहे. आता विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला, तो भाग लँडरच्या सॉफ्ट लँडिंगसाठी उपयुक्त नसावा. तिथे काही तरी अडथळे असावेत. ज्यामुळेच विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यात अडचणी येत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

चांद्रयान २ मोहिमेत विक्रम लँडरचे चंद्रावतरण होण्याच्या काही मिनिट आधी शनिवारी पहाटे त्याचा इस्रोच्या मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. त्यावेळी विक्रम लँडरचे नक्की काय झाले हे सुद्धा समजलेले नव्हते. मात्र, रविवारी विक्रम लँडरची थर्मल इमेज ऑर्बिटरने घेतली असल्याचे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले. त्याचबरोबर संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

१०० दिवसांच्या कार्यकाळाबद्दल अभिनंदन! राहुल गांधींचा सरकारला टोमणा

चांद्रयान २ मोहिमेतील अपेक्षित उद्दिष्ट्य ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत गाठले गेले आहे. यामुळे चंद्राच्या अभ्यासाला मदत होणार आहे, असे इस्रोने स्पष्ट केले आहे.