पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी की शहा, कोण खरं बोलत आहे?, ओवेसींचा सवाल

असदुद्दीन ओवेसी

राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (एनआरसी) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिशाभूल करत असल्याचा आरोप एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. खोटे कोण बोलत आहे? पंतप्रधान मोदी खरे बोलत आहेत की अमित शहा खोटे बोलत आहेत, हे मला जाणून घ्यायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मोदींनी एका मुलाखतीत म्हटले होते की, एनआरसी लागून होईल. आता ते आपल्या वक्तव्यापासून पलटले आहेत. मोदी देशाची दिशाभूल का करत आहेत. त्यांच्या पदाला हे शोभून दिसत नाही. 

...म्हणून प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींचे मानले आभार

पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर म्हटले होते की, सुधारित नागरिकत्व कायदा २०१९ आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी देशातील मुसलमानांवर लागू होणार नाही. जे भारतातील मुसलमान आहेत. ज्यांचे वंशज भारताचे आहेत. त्यांचे सीएए आणि एनआरसीशी काहीच देणेघेणे नाही. देशातील एकाही मुसलमानांना शरणार्थी शिबिरात पाठवण्यात येणार नाही. तसेच भारतातही शरणार्थी शिबीर उभारले जाणार नाही. 

भाजप लक्ष हटवण्यासाठी हे सर्व करत आहे का असा सवाल ओवेसींना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, एनआरसीवरुन लक्ष हटवण्याची भाजपची रणनीती आहे ? सीएए अवैध आहे आणि हा मूलभूत अधिकार आणि देशातील संरचनेला नुकसान पोहोचवते.

Wisden Test team of the Decade: भारताच्या केवळ दोघांचाच समावेश

सीएएला धर्माच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. हे दुर्देवी आहे की, पंतप्रधानांच्या समोर सर्व समान नाहीत. फक्त हिंदू समाजाचे लोक त्यांच्या नजरेत शरणार्थी आहेत. जर ते हिंदूंना नागरिकत्व देऊ शकतात तर मुसलमानांना का नाही. गृहमंत्र्यांनी संसदेत एनआरसीबाबत चुकीचे वक्तव्य केले असे पंतप्रधान मोदींनी सांगितले तर आपण अमित शहा यांच्याविरोधात एक प्रस्ताव आणणार असल्याचे सांगितले.

JMM पेक्षा १५ टक्के जास्त मते घेऊनही भाजप पराभूत

अमित शहा लोकसभेत खोटे बोलले का? त्यांनी माझे नाव घेतले आणि मला म्हटले की संपूर्ण देशात एनआरसी लागू केली जाईल असे सांगितले. संपूर्ण देशात जर एनआरसी लागू झाला तर नागरिक अडचणीत येतील, असेही ते म्हणाले.