पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आग्रामध्ये प्रशासनाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारमुळे टेन्शन!

आग्रामधील रेल्वे पूल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आग्रा येथील जिल्हा प्रशासनाला सध्या वेगळ्याच मुद्द्यांचे टेन्शन आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यासाठी आग्रामध्ये आणण्यात आलेली 'द बिस्ट' गाडी ताजमहालापर्यंत कोणत्या मार्गाने न्यायची आणि ताजमहाल परिसरात कुठपर्यंत जाऊ द्यायची यावरून प्रशासन सध्या बुचकळ्यात पडले आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

कोरोनाच्या बळींचा आकडा २००० पार, IAF च्या विमानाचे उड्डाण उशिराने

ताजमहालाच्या परिसरात इलेक्ट्रिक गाड्यांशिवाय इतर कोणत्याही गाड्या घेऊन जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. १९९८ मध्येच न्यायालयाने या संदर्भात निकाल दिला होता. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचे काम पाहणाऱ्या व्यवस्थेने त्यांची द बिस्ट गाडी ताजमहालाच्या परिसरात नेण्यात यावी, असे म्हटले आहे. आता यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

दुसरे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या द बिस्ट गाडीचे वजनच ६.४ टन इतके आहे. त्यांची ही गाडी आणि ताफ्यातील इतर गाड्यांना रेल्वे पुलावरून जाण्यास परवानगी द्यायची का, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. या पुलावरून केवळ हलक्या वजनाच्या गाड्यांनाच वाहतुकीस परवानगी आहे. पण द बिस्टचे वजन ६.४ टन इतके आहे. आता यावर काय मार्ग काढायचा असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.

निर्भया प्रकरणातील दोषी विनयने आपटले भिंतीवर डोके, किरकोळ जखमी

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया येत्या सोमवारी संध्याकाळी आग्रामध्ये येणार असून, ते ताजमहाल बघणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर आग्रा प्रशासनाला या दोन्ही मुद्द्यांवर  निर्णय घ्यावा लागणार आहे. द बिस्ट गाडी आग्रामध्ये आधीच दाखल झाली आहे.