पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तबलिगींच्या मुद्यावरुन राज्याच्या गृहमंत्र्यांचा अमित शहांवर निशाणा

अनिल देशमुख

देशातील कोरोना विषाणूचा वेगाने झालेल्या प्रादुर्भावास दिल्ली पोलिस जबाबदार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दिल्लीतील तबलिगी समाजाच्या कार्यक्रमामुळे दिल्ली आणि देशभरातील इतर राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर अनिल देशमुख यांनी दिल्ली पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अप्रत्यक्षरित्या त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

 

आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय

अनिल देशमुख म्हणाले की, दिल्लीतील निजामुद्दीन मरकजचा एक कार्यक्रम १५-१६ मार्च रोजी महाराष्ट्रातही आयोजित करण्यात येणार होता. आम्ही त्याला परवानगी दिली नाही. आमच्याप्रमाणे दिल्ली पोलिसांना हा कार्यक्रम का रोखता आला नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.गुरुवारी महाराष्ट्रात १६२ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा एक हजाराहून अधिक झाला आहे.

कोविड-१९: जागतिक संकटाच्या परिस्थितीत आम्ही माणूसकी विसरणार नाही : मोदी

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा वेग हा पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने होताना दिसतोय. राज्यातील मुंबईमध्ये चोवीस तासांत एकशे चाळीसहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूचे देशातील जाळे दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत पाच हजारहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यात १६० हून अधिक लोकांनी आपला जी गमावला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Why did not Delhi Police stop Nizamuddin Markaz programme like us Because of this COVID19 cases have increased says Maharashtra Home Minister Anil Deshmukh