पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BJPच्या संसदीय मंडळात अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्या जागी कोण?

दिवंगत अरुण जेटली आणि सुषमा स्वराज

भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात दिवंगत अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि अनंत कुमार यांच्या जागेवर तीन नव्या सदस्यांची निवड करणे पक्षासाठी आव्हानात्मक ठरत आहे. ११ सदस्यीय संसदीय मंडळात आता ८ सदस्य आहेत. जे नव्या मंडळातही कायम राहतील. तीन जागा भरण्यासाठी वरिष्ठ आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विचार केला जात आहे. यामध्ये एक महिला सदस्याच्या नावाचाही समावेश केली जाण्याची शक्यता आहे. 

मुस्लिम आरक्षणावर उद्धव ठाकरे गप्प का, भाजपचा सवाल

होळीनंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या टीमशी चर्चा सुरु करतील. यामध्ये संसदीय मंडळाबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय पदाधिकाऱ्यांचे नाव निश्चित केले जाईल. या क्रमात नड्डा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर संघ नेतृत्वाबरोबरही चर्चा करतील. आरएसएसच्या १५ ते १७ मार्च रोजी बेंगळुरु येथे होणाऱ्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत नड्डाही सहभागी होतील. त्याचवेळी यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

भाजप, आरएसएसने दिल्लीत दंगल घडवली: प्रकाश आंबेडकर

संसदीय मंडळातील विद्यमान ८ सदस्य कायम राहणार

संसदीय मंडळात आता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याबरोबर संसदीय पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिहं, नितीन गडकरी, राज्यसभेचे नेते तथा केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान आणि सरचिटणीस बी एल संतोष यांचा समावेश आहे. अनंत कुमार, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या निधनामुळे तीन जागा रिक्त आहेत. त्यांच्या जागांवर नियुक्तीसाठी इतर नव्या नेत्यांच्या नावाचा विचार केला जात आहे. यापूर्वी संसदीय मंडळात एका ज्येष्ठ मुख्यमंत्र्याचा समावेश होता. त्यामुळे यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

महिला दिन विशेष : लेडीज डब्बा... येता का आमच्या जगात?

युवा नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता
संसदीय मंडळात महिला सदस्यांसाठी तरतूद नाही. परंतु, दिर्घ काळापर्यंत राजमाता विजयाराजे शिंदे आणि सुषमा स्वराज या संसदीय मंडळात होत्या. त्यामुळे एका महिला नेत्याचा यात समावेश केला जाऊ शकतो. अशात पक्षाच्या उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि रेणू देवी तसे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाची चर्चा आहे. इतर नावांमध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री तथा उपाध्यक्ष रमणसिंह आणि हेमंत विस्वशर्मा यांचा समावेश आहे.

Womens Day Special : ती पंतप्रधान निवडू शकते पण जोडीदार नाही?