पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार: वादात सापडलेले ताहिर हुसेन आहेत तरी कोण?

ताहिर हुसेन

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनानंतर झालेला हिंसाचार आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांवर लावण्यात आला आहे. हिंसाचारा दरम्यान दगडफेकीत मृत्यू झालेल्या अंकित शर्मा यांच्या भावाने पूर्व दिल्लीच्या नेहरू विहारमधील आपचे नगरसेवक मोहम्मद ताहिर हुसेन आणि त्यांच्या समर्थकांवर हा आरोप केला आहे. तर, दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. २५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

दिल्ली हिंसाचार : पश्चिमी उत्तर प्रदेशातून आणल्या गेल्या गावठी पिस्तूल

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अंकित शर्मा यांच्या भावाने त्यांच्या हत्येप्रकरणी आपचे नगरसेवक मोहम्मद ताहिर हुसेन यांचे नाव घेतले. अंकितच्या भावाने आरोप केला आहे की, 'माझा भाऊ अंकित साडेचार वाजता कामावरुन घरी येत होता. त्यावेळी जमावाने त्याला चाळीच्या बाहेर अडवले. जमावाने त्याला खेचून ताहिर हुसेन यांच्या घरी घेऊन गेले.' दरम्यान, सोशल मीडियावर देखील अनेकांनी दावा केला आहे की, दिल्ली हिंसाचारामागे ताहिर हुसेन यांची भूमिका संशयास्पद आहे. ताहिर हुसेन यांच्या घराच्या टेरसवरचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दिल्ली दंगलीची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली, काँग्रेसची टीका

दरम्यान, ताहीर हुसेन यांनी त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, 'माझ्याबद्दल जे दाखवले जात आहे ते खोटे आहे. घाणेरड्या राजकारणासाठी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हापासून कपिल मिश्रा यांनी भडकाऊ भाषण केले आहे तेव्हापासून दिल्लीची परिस्थिती खराब झाली आहे, असा आरोप त्यांनी केला आहेत. तसंच, 'दिल्लीमध्ये ठिकठिकाणी दगडफेक केली जात आहे. परवा दिवशी माझ्या इथे दगडफेक झाली. मी ताबडतोब पोलिसांना फोन करुन बोलावून घेतले. जमावाने माझ्या ऑफिसचे गेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आली.' 

प्रशांत किशोर यांच्याविरोधात कल्पना चोरल्याचा आरोप

तसंच, ताहिर हुसेन यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'पोलिस अधिकाऱ्यांनी माझ्या घराची पाहणी केली. माझ्या घरात कोणीही दंगेखोर सापडला नाही. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने मी जीव वाचवून तिथून निघालो. मी एक खरा, चांगला भारतीय मुस्लीम आहे. मी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी काम करतो. मी माझा जीव वाचवून एका नातेवाईकाच्या घरी थांबलो आहे. मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो की, या संपूर्ण घटनेशी माझा काहीही संबंध नाही.', असे ताहिर हुसेन यांनी सांगितले. 

दिल्ली हिंसाचार : हे गृहमंत्रालयाचे अपयश; रजनीकांत यांची टीका