पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठीच हल्ला, ओवेसींची टीका

असदुद्दीन ओवेसी

सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठीच दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गुंडांकडून विद्यार्थ्यांवर हल्ला घडवून आणण्यात आला, असे एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी म्हटले आहे. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून, विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

'मोदी सरकार जेएनयूतील हुशार विद्यार्थ्यांना घाबरते'

जेएनयूतील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष आणि इतर विद्यार्थ्यांवर रविवारी संध्याकाळी अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. यामध्ये काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याघटनेनंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी या हल्ल्याविरोधात आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर ओवेसी म्हणाले, जेएनयूतील विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे आपला आवाज उठविला म्हणूनच त्यांना 'शिक्षा' देण्यासाठी हा घृणास्पद हल्ला घडवून आणण्यात आला. हे इतके गंभीर आहे की केंद्रीय मंत्रीही याबद्दल काहीही करू शकत नाही. ते केवळ ट्विट करीत आहेत. पोलिस गुंडांची बाजू का घेताहेत, याचे उत्तर मोदी सरकारने दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

नवा वाद! उच्च शिक्षण मंत्री सामंतही ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी

विद्यार्थ्यांच्या आवाजामुळे कोणाच्या मनात भीती निर्माण झाली आहे, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर एमआयएम पक्ष विद्यार्थ्यांसोबत आहे, असेही म्हणण्यात आले आहे.