पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Coronavirus : काळजी घ्या पण अति करू नका, चीनचे इतर देशांना आवाहन

कोरोना विषाणूचा फैलाव चीनमध्ये सर्वाधिक झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचा फैलाव आंतरराष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर केले. पण आता चीनने या मुद्द्यावरून सर्वच देशांना आवाहन करीत म्हटले आहे की, या विषयावर प्रत्येक देशाने जबाबदारीने वागले पाहिजे. आवश्यक काळजी घेतली पाहिजे. पण कोणीही अति करू नये ज्यामुळे या आजाराबद्दल लोकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होईल. 

... म्हणून कुणाल कामरा यांनी इंडिगोच्या वैमानिकाला केला सलाम!

चीनमध्ये या विषाणूची लागण झालेले रुग्ण सर्वाधिक आहेत. आतापर्यंत चीनमध्ये २१३ जणांचा बळी या आजारामुळे गेला आहे. चीनमधील हुबेई प्रांतात आणि त्याची राजधानी वुहानमध्ये या आजाराचा सर्वात जास्त फैलाव झाला आहे. या प्रांतात आणीबाणीची स्थिती आहे. चीनमध्ये या आजाराची लागण झालेले एकूण ९६९२ रुग्ण आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार चीन व्यतिरिक्त इतर १८ देशांमध्ये या विषाणूची लागण झालेले ९८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पण चीन व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशात शुक्रवारी दुपारीपर्यंत या आजारामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. इतर देशांमध्ये या आजाराची लागण झालेले रुग्ण हे आधी वुहानमध्येच होते. तिथून ते आपल्या देशात परतल्यानंतर त्यांच्यामध्ये या आजाराची लक्षणे दिसून आली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

धक्कादायक: जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण करत तरुणीचा विनयभंग

संयुक्त राष्ट्रसंघातील चीनचे राजदूत झॅंग जून यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूशी लढा देण्याचे काम अजूनही चीनमध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे. तेथील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. या कठीण प्रसंगात आंतरराष्ट्रीय समूदायाने दिलेला पाठिंबा निश्चितच आश्वासक आहे. पण सर्व देशांनी अत्यंत जबाबदारीने वागले पाहिजे.