पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : ट्रम्प यांची प्रकृत्ती उत्तम, आरोग्य चाचणी गरजेची नाही- व्हाइट हाऊस

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती उत्तम आहे आणि कोरोना संदर्भात त्यांची कोणतीही आरोग्य चाचणी करण्यात आलेली  नाही असं  व्हाइट हाऊसनं स्पष्ट केलं आहे.  ट्रम्प अनेक सभासदांच्या संपर्कात आले, आता त्यातले काही सभासद  ते कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आले होते या भीतीनं खबरदारी म्हणून स्वतंत्र्य कक्षात राहिले आहेत. 

ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतली नरेंद्र मोदींची भेट

मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत तर दुसरीकडे  सभासदांनाही कोरोना झाला  आहे या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही त्यामुळे ट्रम्प यांची कोरोना विषाणू संदर्भात आरोग्य चाचणी करण्याची तूर्त आवश्यकता नाही असं व्हाइट हाऊसनं म्हटलं आहे. 

इटलीतून आलेल्यांमुळेच भारतात कोरोनाचा मोठा फैलाव

ट्रम्प हे त्या सभासदाभांपासून  लांब होते त्यांचा जवळून कोणाशीही संपर्क नाही असं व्हाइट हाऊसच्या सचिवांनी  सांगितलं आहे. ट्रम्प यांची तब्येत उत्तम आहे आणि डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत असंही सचिवांनी सांगितलं आहे.