पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या देशांच्या शासकीय दौऱ्यावर जाणार आहेत. त्या राष्ट्रप्रमुखांच्या आणि त्या देशातील महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांचे ट्विटर हँडल व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलकडून फॉलो केले जातात. हा दौरा संपला की काही दिवसांनी या हँडल्सला अनफॉलो केले जाते, असे स्पष्टीकरण व्हाईट हाऊसकडून देण्यात आले आहे.

कोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध

व्हाईट हाऊसकडून या आठवड्याच्या सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण सहा महत्त्वाचे ट्विटर हँडल्स अनफॉलो करण्यात आले आहेत. त्यावरून निर्माण झालेल्या शंका दूर करण्यासाठी व्हाईट हाऊसकडून हे निवेदन जारी करण्यात आले. 

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी व्हाईट हाऊसच्या @WhiteHouse या ट्विटर हँडलकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदींचे कार्यालय (पीएमओ), अमेरिकेतील भारतीय दूतावास, भारतातील अमेरिकी दूतावास आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर या सर्वांचे ट्विटर हँडल फॉलो करण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी रिट्विट करण्यासाठी हे हँडल फॉलो करण्यात आले होते. व्हाईट हाऊसकडून केली जाणारी ही सर्वसाधारण प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

दौरा संपल्यानंतर या आठवड्यात हे सर्व ट्विटर हँडल अनफॉलो करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.