दहशतवादाचा मुक्तपणे वापर करणाऱ्या शेजारी देशाशी कोण चर्चा आणि वाटाघाटी करेल, असा प्रश्न परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उपस्थित केला आहे. फ्रान्समधील एका वृत्तपत्राला दिलेल्या दीर्घ मुलाखतीमध्ये त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा कारखाना, त्या माध्यमातून भारतात केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवाया या सर्वांचा नेमकेपणाने उल्लेख करीत कठोर शब्दांत पाकिस्तानला खडे बोल सुनावले.
भाजपला घेतल्याशिवाय सरकार होऊच शकत नाही - चंद्रकांत पाटील
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध जर खरंच सुधारायचे असतील, तर सर्वात आधी पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादी उद्योगांवर कारवाई केली पाहिजे. दहशतवादी निर्माण करण्याचे उद्योग बंद केले तरच उभय देशांमधील संबंध पुढे सरकतील, असे सांगून जयशंकर म्हणाले, पाकिस्तानमध्ये दहशतवादी तयार करण्याचा मोठा उद्योगच आहे. हे दहशतवादी भारतात हल्ले करण्यासाठी वापरले जातात. खुद्द पाकिस्ताननेही याची कबुली दिली आहे. आता अशा देशासोबत कोण चर्चा आणि वाटाघाटी करेल?
ते ट्विट करणाऱ्या मराठी कलाकारांवर सचिन सावंत यांचे आरोप
पाकिस्तानशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध बिघडलेले आहेत. पाकिस्तानला खरंच दहशतवाद्यांवर कारवाई करायची आहे हे आम्हाला कृतीतून दिसले पाहिजे. तरच दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील, असे जयशंकर यांनी सांगितले.