पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

किम जोंग उनचं पुढे काय झालं? या आहेत पाच शक्यता

किम जोंग उन

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा हुकूमशहा किंम जोंग उन यांच्याबद्दल गेल्या आठवडाभरापासून अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचंही म्हटलं जात आहेत, काही दिवसांपूर्वी किम जोंग उनच्या आजोबांची जयंती होती. उत्तर कोरियासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो मात्र यात किम जोंग उन यांचा सहभाग नव्हता. ११ एप्रिलपासून  किम जोंग उन हे सार्वजनिक ठिकाणी कोणालाही वावरताना दिसले नाहीत, त्यामुळे किम जोंग उन यांचे काय झाले? आणि उत्तर कोरियासारख्या गुढ देशांत नेमकं काय चालू आहे याचं कुतूहल सर्वांना आहे. पण तूर्त हे गुढ कोणालाच उकललं नाही. मात्र ब्ल्यूमबर्गच्या रिपोर्टनुसार या पाच शक्यता कदाचित उत्तर कोरियात घडल्या असू शकतात.

बुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत

शस्त्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची शक्यता
द डेली एनकेकडून सेऊलमधून आलेल्या बातमीनुसार किम जोंग उन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याचं समजत आहे. या शस्त्रक्रियेतून किम हे बरे होत असल्याची शक्यता आहे. नुकतीच दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचे सुरक्षाविषयक सल्लागारानं किमविषयी महत्त्वाचे अपडेट्स  दिले. किम जोंग उन जिंवत आहेत आणि त्यांची प्रकृती ठिक असल्याचं ते खासगी वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले होते. 

प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची शक्यता 
तर दुसरीकडे सीएनएन वाहिनीच्या वृत्तानुसार किम जोंग उनची प्रकृती गंभीर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शस्त्रक्रियेनंतर किम जोंग उनची प्रकृती अधिक गंभीर झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीएनएनची शक्यता फेटाळून लावली आहे. हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे .

सोशल डिस्टन्सिंग
 उत्तर कोरियानं आपल्या देशातला कोरोनाग्रस्तांचा आकडा जाहीर केलेला नाही. मात्र कदाचित कोरोना विषाणूच्या खबरदारीचा उपाय म्हणून किम जोंग उन सोशल डिस्टन्सिंग पाळत असल्याचीही शक्यता आहे. 

निर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार

जखमी झाल्याची शक्यता
मिलेट्री ड्रिल्समध्ये कदाचित किम जोंग उन जखमी झाल्याची शक्यता आहे. इथे अनेक क्षेपणास्त्र चाचण्या होत असतात त्यामुळे कदाचित ड्रिल्समध्ये जखमी झाल्याची शक्यता असू शकते.

प्रसिद्धीसाठी
काही राजकीय विश्लेषकांनी किम जोंग उनच्या अचानक नाहीसे होण्यामागे वेगळीच शक्यता वर्तवली आहे. कदाचित प्रसिद्धिसाठी किम अचानक नाहीसा झाल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.