पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मग आम्ही नक्की कुठे सुरक्षित आहोत?, रॉबर्ट वाड्रा यांचा सरकारला सवाल

रॉबर्ट वाड्रा आणि प्रियांका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा समोर आल्यानंतर आता त्यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी केंद्र सरकारवर टीका केली. संपूर्ण देशातील सुरक्षा व्यवस्थेत ढिसाळपणा असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला. त्याचवेळी आपण नक्की कुठे सुरक्षित आहोत, असा प्रश्नही उपस्थित केला.

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांची व्यथा

रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले आहे की, हा केवळ प्रियांका गांधी किंवा माझा मुलगा, मुलगी किंवा माझ्या सुरक्षेचा विषय नाही. हा संपूर्ण देशातील महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे. त्यांना या देशात सुरक्षित असल्याचे वाटले पाहिजे. पण संपूर्ण देशातील सुरक्षाच ढिसाळ झाली आहे. महिलांवर, मुलींवर बलात्कार होत आहेत. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. आपण नक्की कोणता समाज घडवतो आहोत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

देशातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा देणे ही सरकारची जबाबदारी आहे. जर आम्ही स्वतःच्या देशात, स्वतःच्या घरात, देशातील रस्त्यांवर सुरक्षित नसू तर मग आम्ही नक्की कुठे सुरक्षित आहोत, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

... तर या खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळू शकेल तगडी रक्कम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानी काही अज्ञात लोक आले होते. त्यांनी थेट प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानी प्रवेश करून त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले होते. प्रियांका गांधी यांना झेड प्लस सुरक्षा असताना त्यांच्या निवासस्थानी अज्ञात लोक कसे काय आतपर्यंत आले, असा प्रश्न विचारण्यात येतो आहे.